मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यावरून आक्रमक पावित्रा घेतल्यानंतर राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेणार असल्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर आता त्यांच्या या सभेला विरोध होत आहे. राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) सभेला राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) विरोध केला आहे.
मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबाद येथे भव्य सभेची घोषणा केली असता या सभेला मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP) अल्पसंख्यांक विभागाने सभेचीची परवानगी देऊ नये अन्यथा परवानगी दिल्यास हिंदू मुस्लिमांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे. या संदर्भात पोलिस आयुक्त कार्यालयात या संदर्भामध्ये विनंती अर्ज देखील दाखल करण्यात आले आहेत. राज ठाकरे यांची औरंगाबाद मधील सभा होऊ देणार नाही असा इशारा देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलने दिला आहे. त्यामुळे आता पोलिस आयुक्त काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.