महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत; भूमिका वादात सापडण्याची शक्यता

Published by : Lokshahi News

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भुमिकेत दिसणार आहेत. व्हाय आय किल्ड गांधी' या चित्रपटात असलेली त्यांची ही भूमिका आता वादात सापडण्याची शक्यता आहे.

खासदार अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे यांची भुमिका साकारत असल्याची माहिती त्यांनी स्वत:च आपल्या फेसबुक पोस्ट्सद्वारे दिली आहे. 'व्हाय आय किल्ड गांधी' या चित्रपटात असलेली त्यांची ही भूमिका आता वादात सापडण्याची शक्यता आहे. हा चित्रपट 2017 सालचा असून तो सध्या फक्त ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. येत्या 30 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

फेसबुक पोस्टमध्ये काय ?

अमोल कोल्हे यांनी आपल्या फेसबुक पोस्टचं शिर्षक 'मी आणि नथुराम गोडसे ही भूमिका' असं आहे. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय की, २०१७ साली केलेला "Why I killed Gandhi" हा सिनेमा Limelight या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असं समजलं आणि अनेकांनी विचारलं डॉक्टर तुम्ही नथुराम गोडसे या भूमिकेत? उत्तरादाखल मला कुठेतरी वाचलेलं वाक्य आठवलं- "हा महाराष्ट्र कीर्तनानं पूर्णपणे घडला नाही आणि तमाशानं पूर्णपणे बिघडला नाही!" या वाक्यातील नकारात्मक सूर बाजूला ठेवला तर मला या वाक्यात एक सकारात्मक गोष्ट जाणवते ती म्हणजे "Reel लाईफ" आणि "Real लाईफ" यातील फरक स्पष्ट करणारी सीमारेषा अधोरेखित करणं.

मी व्यक्तिगत पातळीवर गांधीजींची हत्या तसेच नथुराम उदात्तीकरण या दोन्हीसाठी समर्थक नाही तरी समोर आलेल्या भूमिकेस न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर आणि व्यक्ती म्हणून विचारस्वातंत्र्याचा! याच मनमोकळेपणाने आपण या कलाकृतीकडे पहावं ही अपेक्षा! अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण