कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना कृषी पदवीच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश देण्याच्या मागणीसाठी अमरावतीत विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसने धरणे आंदोलन पुकारले आहे. तीन वर्ष कालावधीचा कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना आधी कृषी पदवीच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळत होता.
मात्र यावर्षी त्या विद्यार्थ्यांना कृषी पदवीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश नाकारण्यात आला आहे. हा प्रवेश मिळण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला यांनी दिलेल्या पत्रानुसार महासंचालक कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांनी अजूनही काही ठोस पाऊल उचलेले नाही.
त्यामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व सर्व कृषी तंत्रनिकेतनचे विद्यार्थी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे मोठ्या प्रमाणात निदर्शने केली. जर आम्हाला ऍडमिशन मिळाली नाही, तर आम्ही तीव्र स्वरुपाचे आंदोलन उभारू, असा इशारा देखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.