महाराष्ट्र

”आगामी निवडणुका एकञ लढवणार”

Published by : Lokshahi News

शिवसेनेने सह कॉंग्रेससने स्वबळाचा नारा दिला असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठे विधान केले आहे.

उस्मानाबाद मध्ये पञकारांशी बोलताना राजेश टोपे यांनी, राष्ट्रवादी कधीही स्वबळाची भाषा करणार नाही.प्रत्येकाला आपले आमदार वाढवण्याचा अधिकार असुन शरद पवार असतील अजित पवार असतील यांनी आम्हाला महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय ठेवून काम करण्याच्या सुचना दिल्या आहेत.त्यानुसार आम्ही काम करत असतो आणि ही इच्छा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची देखील असल्याने आम्ही सरकारमध्ये स्थिर आहोत. पूढील निवडणुका आम्ही एकञ लढणार अशी प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली.

दरम्यान आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढवणार आहे, अशी माहिती शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली. तर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा स्वबळाचा नारा दिला होता.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका