महाराष्ट्र

Goa Election 2022; राष्ट्रवादीकडून २४ स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Published by : Lokshahi News

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने २४ स्टार प्रचारकांची यादी आज दिल्ली कार्यालयातून जाहीर केली आहे. या स्टार प्रचारक यादीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार अशा दिग्गज नेत्यांची नावे आहेत.

गोवा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आणि शिवसेनेने एकत्र लढण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता गोव्यात राजकारण तापत चालले आहे. दरम्यान प्रचाराचे रणशिंग फुंकण्यासाठी राष्ट्रवादी सज्ज झाली आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने २४ स्टार प्रचारकांची यादी आज दिल्ली कार्यालयातून जाहीर केली.या स्टार प्रचारक यादीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते व राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी खासदार प्रफुल पटेल, राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रियाताई सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, केरळचे वनमंत्री ए. के. ससिनद्रन, राष्ट्रीय प्रवक्ते नरेंद्र वर्मा, खासदार फौजिया खान, युवक राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, विद्यार्थी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहन, अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, गोवा अध्यक्ष जोसे फिलीप डिसोजा, डॉ. प्रफुल हेडे, अविनाश भोसले, सतिश नारायणी (गोवा), केरळचे अध्यक्ष पी. सी. चोको, केरळचे आमदार थॉमस के. थॉमस, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो आदींचा समावेश आहे.

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result