राज्य सरकारने कितीही प्रयत्न केले तरी पिक विमा योजना ही चांगल्या पद्धतीने चालत नाही , ही सत्यपरिस्थिती असल्याचं मंत्री नवाब मलिक यांनी परभणीत आज माध्यमांशी बोलताना सांगितलं.
मोदी जरी पिक विमाबद्दल बोलत असले तरी गुजरातने पिकविमा योजना बंद केली. ही सत्य परिस्थिती आहे. इन्शुरन्स कंपनीचा जिल्ह्यात एकही कार्यालय नाही, सगळं ऑनलाइन काम करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, त्यामुळे शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत असल्याने राज्य शासन काही वेगळं करू शकतं का, असा विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्य शासनाची स्वतःची इन्शुरन्स कंपनी काढून काय करू शकते याचा विचार येणाऱ्या कॅबिनेटमध्ये यासंदर्भात चर्चा करणार असल्याचे मालिक यांनी सांगितले.