महाराष्ट्र

Nawab Malik Arrested | राजीनाम्याचा प्रश्न उद्भवत नाही,छगन भुजबळांनी माध्यमांकडे भूमिका केली जाहीर

Published by : left

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्य़ानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नवाब मलिकांच्या राजीनाम्यावर बैठका पार पडल्या. या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचा संदर्भ देत नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यात येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 

आज अतिशय पहाटे आमचे सहकारी मंत्री नवाब मलिक यांच्या घरी ईडीचे लोक गेले. तपास केल्यानंतर ईडीच्या ऑफिसमध्ये नेण्यात आलं. त्यानंतर अटक करण्यात आली. दोन्ही बाजूनं कोर्टात युक्तिवाद आणि चर्चा झाली, असा संपुर्ण घटनाक्रम भूजबळ यांनी सांगितला.तसेच या प्रकरणावर बोलताना भूजबळ यांनी सांगितले की,1992 च्या घटना, 1999 साली त्या जागेचा करार, त्यानंतर बारा वर्षांनी पीएमएलएचा जन्म झाला. ज्यावेळी पीएमएलएचा जन्म नव्हता. त्यावेळची घटना आहे. बॉम्बस्फोट प्रकरणी अनेक लोक जेलमध्ये गेले, फाशी झाली.

नारायण राणे यांना राजीनामा द्यायला सांगितलं का? 

या प्रकाराचा आम्ही निषेध करतो. लोकशाहीविरोधी हा प्रकार आहे. बोलेल त्याचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न आहे. एकत्रितपणे तिन्ही पक्ष याविरोधात लढणार, जनतेत जाणार आहोत. राजीनाम्याचा प्रश्न उद्भवत नाही, नारायण राणे यांना देखील अटक झाली होती , त्यांना राजीनामा द्यायला सांगितलं का? जोपर्यंत दोषी सिद्ध होत नाही, केंद्राची यंत्रणा सांगतेय, विशिष्ट हेतूनं सांगतेय म्हणून राजीनामा घ्यायला पाहिजे हे आम्हाला पटत नाही, जोपर्ंत दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा घेणार नाही.

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण