खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi rana) यांना वांद्रे न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नवनीत राणा भायखळा, तर रवी राणा तळोजा जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांनी आज खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी यांना न्यायालयात हजर केले. या दोघांवर धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता 124 अ अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज वांद्रे येथील महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने नवनीत राणा आणि रवी राणा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यानंतर आता नवनीत राणा भायखळा, तर रवी राणा तळोजा जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.
तत्पूर्वी राणा दाम्पत्याची कोरोना चाचणी करण्यात आली. आताच मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे आता नवनीत राणा भायखळा, तर रवी राणा तळोजा जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.