Ravi Rana, Navneet Rana, Uddhav Thackeray Team Lokshahi
महाराष्ट्र

उध्दव ठाकरेंनी राज्य कसं चालवायचं हे फडणवीसांकडून शिकावं - नवनीत राणा

Published by : Shweta Chavan-Zagade

मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठणाचा अट्टाहास धरल्यामुळे तुरुंगवारीची वेळ ओढावलेले नवनीत राणा (Navneet Rana) यांना आज लीलावती रुग्णालयातून (Lilavati Hospital) सुटका मिळाली. हेर आल्यावर त्यांनी ठाकरे सरकारला आमची काय चूक होती असा सवाल करत, "तुम्ही आम्हाला हनुमान चालीसाच्या कारणावरुन अटक करत असाल तर मी चौदा दिवसंच काय चौदा वर्षे तुरूंगात राहायला तयार आहे." तसेच उध्दव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray) राज्य कसं चालवायचं हे फडणवीसांकडून शिकावं असं म्हणत ठाकरेंना चॅलेंज करत त्या आता दिल्लीला (delhi) रवाना झाल्या आहेत.

नवनीत राणा आणि रवी राणा ( Navneet Rana and Ravi Rana) यांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. प्रसारमाध्यमांशी बोलायचे नाही, पोलिस तपासात अडथळे आणायचे नाहीत, घटनेशी संबंधित साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारे दबाव आणायचा नाही आणि त्यांना प्रलोभने दाखवून त्यांच्यावर प्रभाव टाकायचा नाही आणि पुन्हा अशा प्रकारच्या गुन्ह्यात सहभाग घ्यायचा नाही, अशा अटी घालण्यात आल्या होत्या. राणा दाम्पत्याने या अटी कबूलही केल्या होत्या. मात्र, तुरुंगात बाहेर पडल्यापासून राणा दाम्पत्य पुन्हा एकदा शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आग ओकताना दिसत आहे.

दरम्यान राजद्रोहाच्या खटल्यात जामीन मंजूर झाल्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तीन दिवसांच्या उपचारानंतर त्यांनी आता दिल्लीचा रस्ता धरला आहे. महाराष्ट्रात राज्य सरकारने अन्याय केला असून लोकप्रतिनिधीला चुकीची वागणूक दिल्याने उद्धव ठाकरेंविरोधात तक्रार करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. राणा दाम्पत्य दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शाह आणि लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत.

IPS Sanjay Pandey: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वाल हा भारतीय संघाचा सुपरस्टार; पहिल्या 10 कसोटींमध्ये केला हा विक्रम

IND vs BAN 1st Test: पहिल्या दिवसाचा खेळ अश्विन आणि जडेजाच्या नावावर

Devendra Fadnavis: लाडकी बहिण योजनेच्या निधीविषयी मोठी अपडेट! देवेंद्र फडणवीस म्हणाले...

One Nation One Electionवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने - सामने