दिल्लीत संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यावेळी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला.
आज संसदेत केंद्र सरकारने ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात राज्याला अधिकाराबद्दल बील आणलं. तेव्हा शिवसेनेचे खासदार हल्ला करत होते. त्यामुळे शिवसेनेच्या पोटात काय आणि ओठात काय, असा सवाल खासदार नवनीत राणा यांनी विचारला आहे.
शिवसेनेच्या खासदारांनी या बिलावर चर्चा करून याला पाठिंबा द्यावा असं आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केलं.