मयुरेश जाधव | नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा वाद पेटला असतानाच आता केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्याकडून या प्रकरणावर प्रतिक्रीया समोर आली आहे. नवी मुंबई विमानतळाला दि.बा पाटील हेच नाव राहणार असल्याची भूमिका कपिल पाटील यांनी मांडली आहे.
केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची नवी मुंबईतून जन आशीर्वाद यात्रा आज निघाली. यावेळी आज भूमिपुत्रांना सोबत मेळावा घेण्यात आला. यावेळी 2015 साली नवी मुंबई विमानतळाला हे दि.बा पाटील नाव दिलं पाहिजेल अशी मागणी कपिल पाटील यांनी केली होती. त्यामुळे आता या विमानतळा नाव देण्याची भूमिपुत्रांची मागणी राज्य सरकारला मान्य करायला लागेल जर नाही केलं तर याचे परिणाम राज्य सरकारला भूमिपुत्रांच्या माध्यमातून भोगावे लागतील, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला.
भूमिपुत्रांच्या किंमत आता राज्य सरकारला कळत नाही, पण जेव्हा कधी निवडणूका येतील तेव्हा भूमिपुत्र कोणत्याही भागातला राहणारा असो तो भूमिपुत्र व्याजासकट या आघाडी सरकारकडून वसुली केल्याशिवाय राहणार नाही,असे पाटील म्हणाले.