उदय चक्रधर
तब्बल २६ दिवसानंतर आर्यन खानला जामीन मंजूर झाले असून अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एनसीबी वर ताशेरे ओढले आहेत. आर्यन खानला खोट्या केसमध्ये फसविण्यात आले असल्याचे वक्तव्य त्यांनी गोंदियात केले आहे.
तर एनसीबीने जे कारवाहीचे फोटो रिलीज केले होते ते घटनास्थाळावरील नसून एनसीबी ऑफिस मधले आहेत असे मलिकांचे म्हणने आहे. "समीर वानखेडे हे फेक कारवाया करत होते, एनसीबीने स्वतःची प्रायव्हेट आर्मी तयार केली होती व निष्पाप लोकांनां या मध्ये फसविल्या जात होते..समीर वानखेडे यांच्या सोबत कासिफ खान हा सुद्धा सहभागी होता त्यामुळे येणाऱ्या काळात कासिफ खानच्या विरुद्ध पुरावे सुद्धा देणार आहोत," असे वक्तव्य नवाब मलिक यांनी गोंदियात केले आहे.