31 ऑक्टोबर रोजी भारतात राष्ट्रीय एकता दिवस साजरा करतात. सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या जयंती निम्मित आदरांजली देण्यासाठी हा दिवस आहे. ही सरदार वल्लभभाई पटेल यांची 146वी जयंती आहे.
सरदार पटेल यांना आपण द आयर्न मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखतो. भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात त्यांचे लाखमोलाचे योगदान आहे. ते स्वतंत्र भारताचे पहिले उपप्रधानमंत्री आहेत. "हा दिवस आपल्या देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षेसाठी वास्तविक आणि संभाव्य धोक्यांना तोंड देण्यासाठी आपल्या देशाच्या अंतर्निहित सामर्थ्याची आणि लवचिकतेची पुन्हा पुष्टी करण्याची संधी देईल." असे विधान भारत सरकारने २०१४ मध्ये जारी करून राष्ट्रीय एकता दिवसाची संकल्पना चालू केली होती.
आज या दिवसानिम्मित गृहमंत्री अमित शाह यांनी केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली अर्पण केली. याच सोबत ऑलिंपियन मनप्रीत सिंग आणि इतर खेळाडू स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परेडमध्ये सहभागी झाले आहेत.