माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या कार्यालयावर एनआयएकडून छापा टाकण्यात आला आहे. शर्मा यांच्या पीएस फाउंडेशन या एनजीओवर एनआयएच्या पथकाने छापेमारी केली.त्यामुळे प्रदीप शर्मांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह दिसत आहेत.
एनआयएने १७ जून रोजी प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी येथील घरी छापा देखील टाकला होता. त्यानंतर दुपारच्या सुमारास प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा एनआयए कडून प्रदीप शर्मा यांच्या कार्यालयांवर छापेमारी करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रदीप शर्मांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह दिसत आहेत.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना अटक केलेली आहे. स्फोटके पेरणे आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांची हत्या, या दोन्ही प्रकरणांत शर्मा यांच्या सहभागाचे पुरावे आढळल्याचा दावा 'एनआयए'ने न्यायालयात केला आहे.