विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. ओबीसी आरक्षणावरुन विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ झाला असून सत्ताधारी आणि विरोधक आपापसात भिडले पाहायला मिळाले. यावेळी तालिका अध्यक्षांनाही धक्काबुक्की झाल्याचा आरोप सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर भाजपच्या 12 आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं. या विषयवार आता अतुल भातखळकर यांनी टीकास्त्र सोडले आहे. या संबधी ट्विट करत भास्कर जाधव यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी त्यांनी केली आहे. या ट्विटमध्ये " विधानसभा अध्यक्षांच्या चेंबरमध्ये शिवीगाळ झाली हे सत्य आहे, ती कोणी केली हे उघड करण्यासाठी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी मी राज्यपालांकडे करणार आहे. शिवीगाळ करण्याचा इतिहास कोणाचा आहे हे अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. #MahaNapasAghadi असे भातखळकर यांनी लिहिले आहे.