महाराष्ट्र

स्मारकाच्या शुद्धिकरणावरून नारायण राणेंचे खडेबोल

Published by : Lokshahi News

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रा मुंबईतून सुरू केली. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अभिवादन करून भाजपाच्या यात्रेला सुरुवात केली. यानंतर शिवसैनिकांकडून स्मारकाजवळ गोमूत्र शिंपडून शुद्धिकरण करण्यात आले. यावर नारायण राणेंनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

जागतिक दर्जाची अनेक स्मारके पाहिली आहेत. तिथं लॉन, फुलझाडे आहेत. मात्र इथं बाळासाहेबांचा फोटोही नीट दिसत नाही, असं राणे म्हणाले. त्यावेळी त्यांनी शिवसैनिकांना खडे बोलही सुनावले.

"मी पत्रकारितेचा आदर करतो. महाराष्ट्राच्या पत्रकारितेला वेगळं स्थान आहे. मी पत्रकारितेला व्यवसाय म्हणत नाही. पत्रकारांचं मार्गदर्शन आम्हालाही मिळावं, तुमच्या अनुभवाचा देशाच्या प्रगतीला फायदा व्हावा अशी अपेक्षा असते. मात्र सध्या पत्रकार मला देशातील प्रश्नांबद्दल विचारण्याऐवजी केवळ गोमूत्र आणि गोमूत्र या एकाच विषयाबद्दल सतत विचारणा करत आहेत. या एकाच विषयासाठी आम्ही आलो आहोत का?", असा सवाल राणेंनी उपस्थित केला.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाच्या अवस्थेबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. "एवढाच जर स्मारकाबद्दल आदर आहे, तर ते ज्या स्थितीत आहे, त्याकडे लक्ष द्या. पँट वर करून दलदलीतून तिकडे जावं लागतं. मी अनेक स्मारकं पाहिली आहेत, त्याच्या आजूबाजूला सुंदर लॉन असतं, सुशोभीकरण केलेलं असतं. झाडं आहेत. इथे काय आहे? साहेबांचा फोटोही नीट दिसत नाही. जे गोमूत्र शिंपडायला आले ना, त्यांनी ते स्मारक जागतिक किर्तीचं कसं होईल याकडेही पाहावं, हेच माझं त्यांना उत्तर आहे", असे राणे म्हणाले.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी