अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामण यांनी सातव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या. यावेळी निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प सादर करताना बिहार आणि आंध्रप्रदेशसाठी विशेष घोषणा केल्या आहेत.
यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्र देशाला सर्वात जास्त कर देते, पण परतावा देताना भाजपा सरकार सुडबुध्दीने वागते. याचा प्रत्यय अर्थसंकल्पातून दिसून आला.
बिहार व आंध्र प्रदेशला ४० हजार कोटींचा निधी देताना महाराष्ट्राचा साधा उल्लेखही केला नाही. सरकार टिकवण्यासाठी बिहार आणि आंध्रप्रदेशला मोठा निधी आणि महाराष्ट्राच्या तोंडाला मात्र पाने पुसली आहेत. असे नाना पटोले म्हणाले.