महाराष्ट्र

गांजातस्करी करणाऱ्या कारचालकाला नागपूर पोलिसांकडून अटक

Published by : Lokshahi News

नागपूर (कल्पना नळसकर): नागपूरमधील पांजरी नाका येथे गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. हा आरोपी कारणे १०० किलो गांजा घेऊन जात असताना नागपूर पोलिसांनी त्याला अटक केली. जावेद असं या आरोपीचं नाव असून तो दिल्लीचा रहिवाशी आहे.

हा आरोपी दिल्लीमधील भंगारच्या दुकानामध्ये वाहनचालकाचे काम करायचा. पण टाळेबंदीमध्ये दुकान बंद झाल्याने तो बेरोजगार झाला आणि त्यामुळे गांजातस्करीकडे वळला. रविवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास नागपूर पोलिसांनी विशाखापट्टनमहून दिल्लीला कारने गांजा घेऊन जात असताना गांजा पोलिसांनी जप्त केला. कारमध्ये १४.८९ लाखांचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.

कारमधून गांजासोबतच फेनिरामाइनमेलेट नामक अॅलर्जीरोधक इंजेक्शन आणि अन्य सामग्रीसहित २४ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. जावेदविरुद्ध नागपूरच्या बेलतारोडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा