नागपूर महानगरपालिकेत साहित्य खरेदी घोटाळ्यातील एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. महापालिका स्टेशनरी साहित्याला पुरवठा न करता खोटी बिले सादर करून कोट्यावधी रुपये उचलण्यात आले. हा घोटाळा गाजत असतानाच पुरवठा करण्यात आलेल्या साहित्याची किंमत बाजारभावापेक्षा तिप्पट-चौपट दर्शवून वित्त विभागाकडून बिल उचलण्यात आल्याचे पुढे आले आहे. घोटाळ्याची व्याप्ती वाढली आहे मनपाच्या दैनंदिन कामकाजासाठी वर्षाला लाखो रुपयाची स्टेशनरी खरेदी केली जाते वर्ष 2016 पासून जादा दराने साहित्याचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती अधिकारात उघडकीस आले आहे.
कुलर व इतर स्टेशनरी साहित्य खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संदीप सहारे यांनी केला आहे. सहारे यांनी केलेल्या आरोपाप्रमाणे महापालिकेत 8 हजार रुपयांचा कुलर हा 59 हजार रुपयांमध्ये खरेदी केल्याचे समोर आले आहे. तर 8 हजार 496 रुपयांचा कुलर तब्बल 79 हजारांना खरेदी केल्याचं दाखवल्याचं आरोप ही सहारे यांनी केला आहे. पेन, पेन स्टॅन्ड, गोंद, स्टेपल मशीन आणि त्याचे पिन, कॅल्क्युलेटर यासह इतर स्टेशनरीच्या खरेदीत ही महापालिकेच्या तिजोरीला मोठा चुना लावण्यात आल्याचा आरोप सहारे यांनी माहितीच्या अधिकाराच्या आधारे केला आहे.