महाराष्ट्र

Nagar Panchayat Election Results 2022 LIVE : नगरपंचायत निकालात कुणाची सरशी, पाहा प्रत्येक अपडेट

Published by : Lokshahi News

महाराष्ट्रातील 106 नगरपंचायंतीच्या निवडणुकीची (Maharashtra Nagar Panchayat Election ) दोन टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. आज राज्यातील नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाचा धुरळा उडणार आहे. गेल्या वर्षी 21 डिसेंबरला राज्यातील 105 नगरपंचायतींसाठी मतदान झालं होतं. तर 18 जानेवारीला राज्यातील 93 नगरपंचायतींच्या 336 जागांसाठी मतदान झालं. या संपूर्ण निवडणुकींचे निकाल आज येणार आहे.

नगरपंचायत निवडणूकांचे लाइव्ह अपडेट…

अहमदनगरच्या अकोले नगरपंचायतीत भाजपची एकहाती सत्ता

भाजप – १२ जागेवर विजयी
काँग्रेस – १ जागेवरी विजयी
राष्ट्रवादी – २ जागेवर विजयी

गोंदियाः जिल्हा परिषद निवडणूक निकालाचा पहिला कल राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने, नेहा तुरकर १२०० मतांनी आघाडीवर

भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे विजयी खाते; देहू नगरपंचायतीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता

बुलडाणाः मोताळा नगरपंचायतीत १२ जागांवर काँग्रेस विजयी, सेना ४ , राष्ट्रवादी १ जागेवर विजयी

यवतमाळः राळेगाव नगरपंचायत निवडणुकीमध्ये मध्ये काँग्रेसचे ४ उमेदवार विजयी

तिवसा नगरपंचायतीवर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचं वर्चस्व; काँग्रेसचा १२ जागांवर विजय

हिंगाणा नगरपंचायतीत ३ जागांवर भाजप विजयी

सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये आघाडीची सत्ता, राणेंना धक्का

सिंधुदुर्गच्या कुडाळची सत्ता आघाडीने नारायण राणेंकडून हिसकावली आहे.

शिवसेना – ७ जागेवर विजय
काँग्रेस – २ जागेवर विजय
भाजप – ८ जागेवर विजय

रायगडच्या पोलादपूरवर शिवसेनेचा झेंडा

शिवसेना – १० जागांवर विजयी
राष्ट्रवादी आणि काँग्रेस – ६ जागांवर विजयी
भाजप – १ जागेवर विजयी

औरंगाबादच्या सोयगावमध्ये रावसाहेब दानवेंना धक्का. ११ पैकी ८ जागांवर शिवसेना विजयी

राज्यमंत्री विश्वजीत कदमांच्या कडेगाव नगरपंचायतीत भाजपचे कमळ फुलले आहे.

भाजप – १० जागेवर विजय
काँग्रेस – ६ जागेवर विजय

सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका प्रभाग 16 अ चा निकाल,

महेंद्र चंडाले- 535
अमोल गवळी- 3434
सुरेश सावंत -587
तौफिक शिकलगार- 7429
उमरफारूक ककमरी :21
समीर सय्यद – 18

काँग्रेसचे तौफिक शिकलगार 3995 मतांनी विजयी

नाशिक : नगरपंचायत निवडणूक
सुरगाणा – 17 जागा निकाल जाहिर
शिवसेना – ६ जागेवर विजय
भाजप – ०८ जागेवर विजय
माकप – ०२ जागेवर विजय
राष्ट्रवादी – ०१ जागेवर विजय

नगरपंचायतीचे नाव – निफाड
एकुण जागा – 17
शिवसेना- 07 जागेवर विजय
काँग्रेस-01 जागेवर विजय
राष्ट्रवादी-01 जागेवर विजय
शहर विकास आघाडी – 01 जागेवर विजय
बसपा- 01 जागेवर विजय
इतर(अपक्ष)-01 जागेवर विजय

देवगड – भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा शिरकाव सहा जागा पटकावल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसला एक तर भाजपला पाच जागा मिळवल्या आहेत. संदेश पारकर यांनी एक हाती बालेकिल्ल्याच्या नेतृत्व करत आमदार नितेश राणे यांना धक्का दिला.

अमरावतीच्या तिवसा नगरपंचायतीत काँग्रेस विजयी झाली आहे.

काँग्रेस – १२ जागा विजयी
शिवसेना – ४ जागा विजयी
वंचित – १ जाग विजयी

संग्रामपूर नगरपंचायत बच्चू कडू यांच्या प्रहारची एकहाती सत्ता मिळवली आहे. बच्चू कडूंनी भाजपच्या संजय कुटेंची धोबीपछाड केली आहे. प्रहार जनशक्तीचा १२ जागांवर विजय मिळाला आहे.

साताऱ्याच्या पाटण नगरपंचायतीत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंना धक्का

पाटण नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात

अकोला नगरपंचायत

भाजप – ८ जागा विजयी
शिवसेना – २ जागा विजयी
राष्ट्रवादी काँग्रेस – २ जागा विजयी

कवठे महांकाळ नगरपंचायतीत आर.आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांचा विजय. रोहित पाटील यांनी एकहाती सत्ता मिळवली आहे.

राष्ट्रवादी – १० जागेवर विजयी
शेतकरी विकास – ६ जागेवर विजयी
अपक्ष – १ जागेवर विजयी

परभणीतील पालम नगरपंचायतीमध्ये

राष्ट्रवादी – ५ जागेवर विजयी,
रासप – ३ जागेवर विजयी
अपक्ष – १ जागेवर विजयी

उस्मानाबाद वाशीम नगरपंचायत

भाजप – ३ जागेवर विजयी
शिवसेना – ४ जागेवर विजयी

देहू नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता

राष्ट्रवादी – १३ जागेवर विजयी
भाजप – १ जागेवर विजयी
अपक्षा – २ जागेवर विजयी

रायगड खालापूरमध्ये शिवसेनेला ५, शेकाप २, राष्ट्रवादीला १ जागेवर विजय

रायगडच्या माणगावमध्ये राष्ट्रवादीला ४, शेकाप १ आणि इतरांना १ जागा मिळाली आहे.

नंदुरबारमध्ये आदिवासी विकासमंत्री के.सी.पाडवी यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना १३ जागांवर, काँग्रेस ३ जागांवर आणि भाजप एका जागेवर विजयी झाली आहे.

शिवसेनेच्या ताब्यात नंदुरबारमधील धडगाव नगरपंचायत

उस्मानाबाद वाशी नगरपंचायत निकालात भाजपला १ आणि शिवसेनाला २ जागा मिळवण्यात यश

कर्जत जामखेड नगरपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात

कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार यांची सरशी, राम शिंदेंना पराभवाचा धक्का.

जालना तीर्थपुरी नगरपंचायतीत राष्ट्रवादीला ४, भाजप १, शिवसेना १ जागेवर विजय मिळाला आहे.

केज नगरपंचायतीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांची कन्या हर्षदा यांच्या गळ्यात विजयाची माळ

वैभववाडी नगरपंचायतीमध्ये भाजप २ जागांवर तर शिवसेना १ जागेवर विजयी

पंढरपूरच्या माढा नगरपंचायतीत काँग्रेसला ५ जागांवर विजयी

धुळे जिल्ह्यातील साक्री नगरपंचायतीत भाजपला २ जागेवर विजय

सेलू नगरपंचायतीमध्ये भाजप १, काँग्रेस २, अपक्ष १ जागेवर विजयी

कारंजा नगरपंचायतीत भाजप चार जागी विजयी, समुद्रपूर नगरपंचायत भाजप १, बसपा १, राष्ट्रवादी १ जागेवर विजयी

अमरावतीत तिवसा नगरपंचायतीमध्ये काँग्रेस ४, शिवसेना आणि वंचितला प्रत्येकी १ जागेवर विजय

पालघर जिल्ह्यातील विक्रमगडमध्ये ३ विक्रमगड विकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. तर एका जागेवर शिवसेनेचा उमेदवार विजयी

सोलापूरच्या वैरागमध्ये राष्ट्रवादीचे ३ उमेदवार विजयी

बीडमधील आष्टी नगरपंचायतीत ४ जागी भाजपचा विजय

शिरुर नगरपंचायत पहिल्या फेरीत भाजप ३ जागी विजयी

नाशिकच्या देवळा नगरपंचायती निकालात भाजप ६ आणि राष्ट्रवादी १ जागेवर विजयी

कर्जत जामखेडमध्ये राष्ट्रवादी ७ तर भाजप १ जागी विजयी

विश्वजीत कदमांच्या कडेगावात भाजप-काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर. काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी ३ जागांवर विजय

नंदुरबारच्या धडगावात ६ जागेवर शिवसेना, २ जागेवारी काँग्रेस आणि १ जागेवर भाजप विजयी झाला आहे.

बुलढाणाच्या संग्रामपूरमध्ये प्रहार जनशक्तीच्या कविता तायडे ९ मतांनी विजयी झाल्या आहेत.

बीड जिल्ह्यातील पाटोदा नगरपंचायतीत भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. तर पाटोद्यात एका जागेवर अपक्षाचा विजय झाला आहे.

कुडाळमधून शिवसेनेच्या श्रृती वर्दम विजयी झाल्या आहेत. तसेच भाजपच्या नयना मांजरेकर विजयी झाल्या आहेत.

दापोली वॉर्ड क्रमांक २ मधून राष्ट्रवादीचे नौशिन गिलगिले विजयी झाले आहेत.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती