कांदा दराचे अधिकार पुन्हा नाफेडकडे देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी काही दिवसांपूर्वी केंद्राने नाफेडचा अधिकार काढत कांद्याचे दर केंद्र सरकार ठरवणार होते मात्र शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून आली.
याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा कांदा दराचे अधिकार नाफेडकडे देण्यात आले आहेत. कमी दरामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती.
त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या नाराजीनंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असून आता नवा दर काय असणार याकडं शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.