महाराष्ट्र

महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार; राहूल गांधीसोबतच्या बैठकीनंतर पटोलेंचे वक्तव्य

Published by : Lokshahi News

आगामी महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसने पुन्हा एका स्वबळाचा नारा दिला आहे. राहुल गांधींसोबत झालेल्या बैठकीत पक्षाच्या रणनीतीबाबत चर्चा झाली. या बैठ्कीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कॉंग्रेस महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्नाटकचे काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांच्यासमवेत नाना पटोले यांनी मंगळवारी राहुल गांधींची भेट घेऊन पक्षाच्या रणनीतीबाबत चर्चा केली होती. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राज्यातील पक्षाच्या भवितव्यासाठी 'मास्टर प्लॅन' प्रस्तावित केला असल्याची माहिती दिली. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असूनही काँग्रेस स्थानिक निवडणुका एकट्यानेच लढवणार आहे असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

"महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल हा निर्णय राहुल गांधी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत झाला आहे. पक्षश्रेष्ठींचा हा निर्णय आहे तो सर्वांना पाळावा लागेल. तसेच कुठल्याही मंत्र्याच्या चुकीचा अहवाल काँग्रेस वरिष्ठांना गेला नाही," असे पटोले म्हणाले.

परिवर्तन महाशक्तीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार

यही समय है, सही समय है, सोए हुओं को जगाने का…; देवेंद्र फडणवीसांच्या ट्विटने चर्चांना उधाण

गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त

भाजपचे दिग्गज नेते महाराष्ट्रात; विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी

मुंबईत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 19 ते 21 नोव्हेंबरला रात्री विशेष लोकल