महाराष्ट्र

महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं, पुण्याची प्रभाग रचना 1 फेब्रुवारीला होणार जाहीर

Published by : Lokshahi News

राज्यात महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. पुणे (Pune) महानगरपालिकेची प्रभागरचना 1 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार असून त्यावरील अंतिम निर्णय हा 2 मार्चला होणार आहे. प्रभाग रचना अंतिम होत असल्याने राजकीय पक्षांचे लक्ष या सर्व प्रक्रियेकडे लागलेलं आहे. सर्व राजकीय पक्ष महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. प्रभाग रचनेनंतर आरक्षणाची सोडत जाहीर होणार असल्याचं राज्य निवडणूक आयोगानं कळवलेलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात जाहीर होणारी प्रभाग रचना राजकीय पक्षांची पुढची रणनीती ठरवण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

पुण्याची प्रभाग रचना 1 फेब्रुवारीला जाहीर होणार
अखेर पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रभाग रचनेचे बिगुल वाजले आहे. 1 फेब्रुवारीला पुण्यातील प्रभाग रचना जाहीर होणार आहे. 2 मार्चला प्रभाग रचनेवर अंतिम निर्णय होणार आहे. प्रभागरचनेकडे पुण्यातील सर्वपक्षीय इच्छुकांच्या नजरा लागल्या होत्या. महापालिकेने 20 जानेवारीला निवडणूक आयोगाला 24 बदलासह सुधारित आराखडा आयोगाला सादर केला होता.

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय