महाराष्ट्र

मुंबई दहशतवादी हल्ला करण्याची धमकी; पोलीस आयुक्तांनी दिली माहिती

सणासुदीच्या काळात मुंबईवर दहशवादाचे सावट

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : सणासुदीच्या काळात मुंबईवर दहशवादाचे सावट निर्माण झाले आहे. मुंबईत 26/11 सारखा हल्ला करणार असल्याचा धमकीचा मेसेज मुंबई पोलिस ट्रॅफिक कंट्रोल रुमला आला आहे. यामुळे पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. हा तपास क्राइम ब्रांचकडे सोपवण्यात येणार असून सखोल तपास केला जाईल, असे फणसाळकरांनी सांगितले आहे.

विवेक फणसाळकर म्हणाले की, काल पावणे बाराच्या सुमारास मुंबई ट्रॅफिक व्हॉट्स अॅपवर धमकीचे मेसेज आले. भारतात त्याचे साथीदार आहेत. यासंदर्भात वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे आणि हा तपास क्राइम ब्रांचकडे सोपवण्यात येणार आहे. मुंबई क्राइम ब्रांचने सखोल तपास करत आहेत.

या संबंधित आम्ही इतर जे नंबर्स या चॅटमधे दिसत आहे त्याचाही तपास सुरू केला आहे. मुंबईकरांना सांगतो की आम्ही यावर लक्ष ठेवून आहोत. क्राईम ब्रांचची 3 टीम आणि एटीएसची टीम याांनी तपास सुरु केला आहे. कोण आहेत त्यांची नावं लवकरच आम्ही शोधून काढू, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, हरिहरेश्वर किनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळून आली होती. या बोटीची तपासणी केली असता यामध्ये AK 47 बंदुका आढळून आल्या होत्या. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे दहशतवादी कृत्य नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. या पार्श्वभूमीवर विवेक फणसाळकर यांनी आम्ही सागर कवच लाँच केले आहे आणि सागरी भागातील सुरक्षेला सतर्क केले आहे, अशी माहिती दिली आहे.

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी