केंद्राने आदर्श भाडेकरू कायद्याला परवानगी दिल्यानंतर त्याचे पडसाद मुंबईत उमटले आहेत. आज लालबाग आणि बोरीवलीमध्ये शिवसेनेने या कायद्याविरोधात आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारवर टीका करण्यात आली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. काही ठिकाणी केंद्र सरकारच्या विरोधाती पोस्टर देखील लावण्यात आले. यामुळे शहरातील २५ लाख भाडेकरूंचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे सेनेने सांगितले.
हा कायदा पागडी मालकांसाठी केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. तसेच यामुळे मुंबईतील भाडेकरूंचा प्रश्न उपस्थित होणार असल्याचे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.