पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडल्याने मुंबईत शिवसेना रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या प्रदेश कार्यालयासमोर इंधन दरवाढीविरोधात बॅनरबाजी केली. यावेळी भाजपा आणि सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाजी झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजीही केली.
पोलिसांनी वेळीच पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. पेट्रोलने शंभरी गाठल्यानंतर शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. 'मोदी मतलब महंगाई' असं म्हणत या कर्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावर भाजपाच्या कार्यकरत्यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे सेना अणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.