सकाळी काही ठिकाणी पाणी साचलं होतं. आता बारीक ठिकाणी निचरा होत आहे.पाणी भरणार नाही, असा कोणीच दावा केला नव्हता, करणार नाही. पण ४ तास पाणी तसंच राहील, असं होणार नाही. भरतीच्या वेळेत पाणी साचणार कारण ते बाहेर सोडता येत नाही. कोणी म्हणत असेल, पाणी साचत तर ४ तासाहून जास्त काळ पाणी तुंबल नाही, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.
मी आढावा घेतला आहे. १९५ मिली, १३७ मिली पाऊस झाला आहे. ९५ मिली पाऊस झाल्यास अंडरवॉटरपाणी डायव्हर्ट होतं. पण आता बऱ्याच ठिकाणी पाण्याचा निचरा झाला आहे. मुंबईत पाणी भरणारच नाही, असा दावा कोणीच केला नाही. पूर्वी २ ते ५ दिवस मुंबई ठप्प व्हायची. पण आता तसं होत नाही. आम्ही सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहोत. निष्काळजीपणा होत असेल तर कार्यवाही करू. मागच्या वर्षीपासून आपल्याकडे मनुष्यबळ कमी झालं आहे पण ते कारण सांगून आम्ही पळवाट काढणार नाही. आम्ही पूर्णच पाणी जास्त साचणार नाही याची काळजी घेऊ, असंही पेडणेकर म्हणाल्या.
विरोधकांना आरोप करायचे आहेत. ते करूदेत आम्ही उत्तर देत बसणार नाही. निंदकाचे घर असावे शेजारी, ते सांगतील तेही बघून काम करू. हिंदमातामधील टाक्यांचं काम बाकी आहे. कोरोनामुळे तर लवकर करता आलं नाही. पण येणाऱ्या ऑगस्ट-सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असंही त्या म्हणाल्या.
रेल्वे अधिकारी देशात फारसे समनव्य साधत नाहीत, त्यांच्या भागात जाऊन आम्ही कचरा साफ करतोय. करी रोड ढिलाई रोड इथे पाणी भरण्याचं प्रमाण कमी झालय. रेल्वेने काम पूर्ण करायला हवेत. नाहीतर आम्हाला तिथे काम करण्याची परवानगी द्यावी. आमचे सगळे खासदार या गोष्टीवर दरवर्षी बोलत असतात, त्यांच्या यंत्रणेशी आमचं टायप व्हायला हवं, असंही पेडणेकर यांनी सांगितलं.