महाराष्ट्र

Mumbai Rains : चुनाभट्टी पोलीस ठाणे हद्दीत दरड कोसळली, 4 घरांचे नुकसान

चुनाभट्टीच्या (Chunabhatti) नागोबा चौक डोंगर भागातील चार घरांवर दरडी कोसळण्याची घटना बुधवारी सकाळी घडली. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Published by : Shweta Chavan-Zagade

चुनाभट्टीच्या (Chunabhatti) नागोबा चौक डोंगर भागातील चार घरांवर दरडी कोसळण्याची घटना बुधवारी सकाळी घडली. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तत्काळ बचाव कार्य सुरु करण्यात आलं असून तीन जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. घटनास्थळी चेंबूर अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत दोघांना सुखरूप बाहेर काढले असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात (Sion Hospital) उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नागोबा चौक परिसरातील डोंगरात झोपडपट्टी भाग असून पावसाळ्यात 25 ते 30 कुटुंब जीव मुठीत घेऊन राहतात. बुधवारी सकाळी डोंगरातील दरड चार घरांवर कोसळल्या. त्यावेळी मोठा आवाज आल्याने घरातील बहुतेकजण बाहेर येऊन सुरक्षितस्थळी उभे राहिले. त्यामुळे मोठी जीवितहानी टाळली. शिवम सोनवणे व प्रकाश सोनवणे यांच्यावर सध्या सायन रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. सध्या अग्निशमन दलाच्या वतीनं त्याठिकाणी साठलेला मलबा बाजूला करण्याचं काम सुरु आहे. सुदैवानं कोणतीबी जीवीतहानी झालेली नाही.

रात्रभर उसंत घेतलेल्या पावसानं सकाळपासूनचं मुंबईसह उपनगरांत दमदार हजेरी लावली आहे. अनेक सखल भागांत पाणी साचलं असून वाहतूकही संथ गतीनं सुरु आहे. अशातच कालपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईत काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. कालही मुंबईच्या घाटकोपर भागात खंडोबा टेकडीवर असलेल्या पंचशील नगर येथे एका घरावर दरड कोसळली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घराचं मोठं नुकसान झालं होतं.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय