राज्यात कोरोनाच्या दोन वर्षानंतर उद्या मोठ्या जल्लोषात गणपती उत्सव पार पडला जात आहे. अशातच यंदा मोठ्या संख्येने गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. विसर्जनाच्या दिवशी महत्त्वाच्या विसर्जन स्थळी पाहायला मिळेल. त्यामुळे होणाऱ्या गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी शिवाय या गर्दीवर कडी नजर ठेवण्यासाठी मुंबई पोलिस सज्ज झाले आहेत.
गर्दीवर नियंत्रण त्यासोबतच वाहतुकीवर नियंत्रण असे दुहेरी आव्हान विसर्जनाच्या दिवशी मुंबई पोलिसांवर असणार आहे. त्यासाठीच विशेष नियोजन बंदोबस्त संदर्भात मुंबई पोलिसांकडून करण्यात आला आहे. सकाळपासून साडे पंधरा हजार पोलीस आणि SRPF च्या तुकड्या तैनात असणार आहेत, अशा माहिती मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिली आहे.
असा असणार पोलिसांचा बंदोबस्त
एसअरपीएफ आणि रॅपिड अॅक्शन फोर्सच्या टीम तैनात असतील त्यासोबतच फोर्स वनची विशेष टीम सुद्धा तैनात असणार आहेत.
तर सोबतच 600 पोलीस महिला अधिकारी कर्मचारी हे साध्या वेशात महत्त्वाच्या विसर्जन स्थळाच्या ठिकाणी तैनात असतील.
मुंबईतील 77 महत्त्वाचे विसर्जन स्थळ आणि कृत्रिम तलावच्या ठिकाणी हा बंदोबस्त तैनात असणार आहे.
विशेष म्हणजे क्राईम ब्रान्च आणि एटीएस अधिकारी सुद्धा विसर्जनाच्या दिवशी विशेष बंदोबस्तावर असणार आहे.
लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी विशेष बंदोबस्त असेल. यामध्ये सह पोलीस आयुक्तांच्यासोबत अडीच हजार पोलीस तैनात असणार.
होमगार्डशिवाय स्वयंसेवी संस्था, एनसीसी विद्यार्थीसुद्धा पोलिसांसोबत वाहतूक हाताळण्यास विसर्जनवेळी मदतीसाठी असणार आहेत.
पोलिसांकडून महत्वाच्या ठिकाणी व रस्त्यावर सीसीटीव्ही सुद्धा लावण्यात आले आहे.