महाराष्ट्र

Kishori Pednekar Discharge | मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

Published by : Lokshahi News

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते.

महापौर किशोरी पेडणेकर यांना छातीत दुखण्याचा त्रास होत होता. मात्र आज त्यांचा हा त्रास वाढल्यानंतर त्यांना 18 जुलै रोजी परळमधील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले. ग्लोबल रुग्णालयातील डॉक्टरांचे एक पथ पेडणेकर यांच्यावर उपचार करत होते.ही माहिती महापौर कार्यालयातून देण्यात आली आहे. दरम्यान आता महापौर किशोरी पेडणेकर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

किशोरी पेडणेकर यांची प्रकृती उत्तम असून त्या आज (20 जुलै) परळ येथील ग्लोबल रुग्णालयामधून सुखरूप घरी परतल्या आहेत. ग्लोबल रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या निरोपाला उत्तर देताना महापौर म्हणाल्या की, ग्लोबल रुग्णालय आपल्या नावाप्रमाणे येथे आलेल्या प्रत्येक रुग्णांची या आरोग्य मंदिरात चांगली सेवा करीत असून मी सर्व रुग्णालय कर्मचाऱ्यांचे आभार मानते. 

Lokshahi Marathi Live Update : नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...