मुंबई लोकलमधील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकलमध्ये तिकीट चेकरला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पश्चिम रेल्वे मार्गावरील असल्याच समजत आहे. एसी लोकल चर्चगेटगून विरारला निघाली होती.
टीसी जसबीर सिंग हे एसी लोकलमध्ये तिकीट चेकींगसाठी सुरुवात केली. यावेळी त्याठिकाणी असलेल्या तीन तरुणांकडे एसी लोकलचं तिकीट नव्हतं. त्यामुळे जसबीर सिंग यांनी त्यांना दंड भरून प्रवास पुढे सुरु ठेवण्यास सांगितलं किंवा बोरिवली स्टेशनवर उतरण्याचा पर्याय दिला. पण त्यांनी उतरण्यास नकार दिला अन् टीसीसोबत वाद सुरु केला. आणि या वादाचं रुपांतर मारहाणीत झालं. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
जसबीर सिंह यांनी तिघांना दंड भरण्यास सांगितलं, पण त्यांनी भांडणाला सुरुवात केली. तरुणांनी थेट टीसी जसबीर सिंह यांना मारहाण सुरु केली. त्यांचा शर्ट फाडण्यात आला अन् शिविगाळ करण्यात आली. यात जसबीर सिंग यांना दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे.