मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेन कोरोना काळात काही महिने बंद होत्या. अनलॉक दरम्यान लोकल सेवा चालू केली खरी परंतु बरेच निर्बंध अजुनही लागू आहेत.
मात्र आता 28 ऑक्टोबर 2021 पासून मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या फेऱ्या पूर्ण क्षमतेने चालू होणार आहेत. प्रवाशांची होणारी गर्दी लक्षत घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.
लोकलच्या फेऱ्या जरी वाढल्या असल्या तरी लोकल ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी सगळ्यांना मिळालेली नाही. सरकारी कर्मचारी आणि लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या प्रवाशांनाच ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी आहे.