मुंबई : दिपावलीनिमित्त हवेची गुणवत्ता उत्तम राखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. मुंबईतील सर्व तूर्तास बांधकाम बंद करण्याचे सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. काही दिवस बांधकाम बंद राहिलं तर आभाळ कोसणार आहे का? असा सवाल न्यायालयाने विचारला असून विकासकामांपेक्षा लोकांची जीव महत्त्वाचा असल्याचे म्हंटले आहे. हवेची गुणवत्ता सुधारा अन्यथा सर्व सार्वजनिक प्रकल्प रोखू, असा इशाराच न्यायालयाने दिला आहे.
मुंबईत दिवसेंदिवस खालवत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती देंवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडली आहे. यावेळी हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मुंबईत हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मार्चमध्ये मनपातर्फे हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी दिलेला आदेशाचा पालन करण्यात यावे. प्रत्येक वार्डचे सहायक मनपा आयुक्त प्रत्येक वार्डसाठी जबाबदार राहणार असल्याचेही न्यायालयाने म्हंटले आहे.
मुंबई बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी भिंतीची उंची धूर रोखण्यासाठी योग्य आहे की नाही याची खात्री मनपातर्फे करण्यात यावी. बांधकाम बंदीबाबत प्रशासनाला अखेरची संधी न्यायालयाकडून देण्यात आली आहे. येत्या शुक्रवारपर्यंत AQI मध्ये सुधारणा न झाल्यास दिवाळीचे चार दिवस बंदी लागू करण्याचा इशाराही न्यायालयाने दिला आहे. बांधकामातील डेब्रिज वाहून नेणारी वाहनं ताडपत्रीनं पूर्णपणे झाकणं बंधनकारक आहे. तसेच, सार्वजनिक किंवा खुल्या जागेवर डेब्रिस डम्पिंग करू नये, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
फटाक्यांवर बंदी घालण्याची इच्छा नाही. मात्र याबाबत कोर्टानं घालून दिलेल्या निर्देशांच काटेकोर पालन करावे. मनपा आणि पोलीस यांनी हे सुनिश्चित करावा की फटाके फोडण्याबाबत नियमांचा पालन केला जातं आह का? आवाज करणारे फटाके रात्री ७ ते १० वेळेतेच वाजविण्यास परवानगी द्यावी. वेळोवेळी निर्धारित करून दिलेल्या नियमांचा पालन करण्यात यावं, असेही न्यायालयाने म्हंटले आहे.