महाराष्ट्र

Mumbai : भाजप महिला नेत्यावर अज्ञात व्यक्तींकडून हल्ला

भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्रच्या प्रदेश महिला प्रमुख Sultana Khan यांच्या डाव्या हाताला दुखापत

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : भाजपा (BJP) महिला मोर्चा महाराष्ट्रच्या प्रदेश महिला प्रमुख सुलताना समीर खान (Sultana Khan) यांच्या गाडीवर दोन अज्ञात इसमांनी मध्य रात्री हल्ला केला आहे. यात सुलताना यांच्या डाव्या हातावर दुखापत झाली आहे. तसेच, हल्लेखोरांनी सुलताना यांना अर्वाच्य भाषेती शिवीगाळ केल्याचेही समजत आहे.

सुलताना समीर खान यांच्या काल रात्री सुलताना ह्या त्यांच्या पतीसोबत कारने कामानिमित्त निघाल्या होत्या. एवढ्यात मीरा रोडमधील नयानगरजवळ दुचाकीवरून तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोन तरुणांनी त्यांची गाडी अडवली. त्यानंतर त्यांनी गाडीवर हल्ला केला. तसेच धारदार वस्तूने सुलताना यांच्यावर हल्ला केला.

सुदैवाने यात फक्त सुलताना यांच्या हाताला दुखापत झाली. त्यांना तात्काळ त्यांच्या पतीने मीरा रोडच्या इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. तिथे त्यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आले. त्या जबाब देण्याच्या स्थिती मध्ये नसल्याने त्यांची अजून तक्रार नोंद करण्यात आली नाही.

दरम्यान, ४ जुलै रोजी फेसबुक अकाउंटवरुन एका व्हिडीओत सुलताना यांनी आपणाला मुंबईच्या पदाधिकारीकड़ून धमकी येत असल्याचे सांगताना दिसत आहे. त्यांचा पूर्वीचा व्हिडीओ कुणीतरी डिलीट केल्याच सांगत आहे. ना डरी हूँ… ना डरूँगी, असं त्यांचे शेवटच्या व्हिडीओमध्ये म्हणत आहेत. त्यामुळे या हल्ल्यातील आरोपी कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय