किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे संपूर्ण शहर तुंबल्याचे चित्र आहे. हवामान खात्याने १२ जूनपर्यंत किनारपट्टी भागात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने शहरात पाणीच पाणी झाले. मुंबईतील बसचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बेस्ट ड्रायव्हर हातात छत्री घेऊन गाडी चालवत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र फिरतोय.