मुंबै बँक घोटाळ्याप्रकरणी बँकेचे अध्यक्ष व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण आज सहकार विभागाचे अधिकारी चौकशीसाठी मुंबई बँकेच्या मुख्य कार्यालयात हजर झाले होते.यावेळी अधिकार्यांकडून चौकशी करण्यात आली.
सहकार विभागाचे अधिकारी नियम 83 अंतर्गत चौकशीसाठी मुंबै बँकेच्या मुख्य कार्यालयात हजेरी लावली होती. बँकेत सहकार विभागाच्या अधिकार्यांनी चौकशी केली.
मुंबै बँकेतील काही कथित अनियमितेप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे.- या नोटीसला १ नोव्हेंबर पर्यंत बँकेला उत्तर द्यायचे आहे.जर बँकेने नोटीसनुसार माहिती दिली नाही तर सहकार विभागाला प्राप्त झालेल्या अहवालाच्या आधारे कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हं आहेत.