Pravin Darekar  
महाराष्ट्र

मुंबै बँक प्रकरण; प्रविण दरेकरांना दुसरी नोटीस

Published by : left

मुंबै बँक (Mumbai Bank Case) कथित घोटाळा प्रकरणात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांना पुन्हा चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी नोटीस (Notice by Mumbai Police) बजावली आहे. त्यांना 11 एप्रिलला चौकशीला बोलावण आलं आहे. मुंबई पोलिसांनी नोटीस (Notice by Mumbai Police) बजावण्याची ही दुसरी वेळ आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्यामागे चौकशीचा ससेमीरा लागला आहे. गेल्या सोमवारी ४ एप्रिल रोजी हजर राहण्यासाठी प्रविण दरेककरांना (Pravin Darekar) पोलिसांनी नोटीस बजावली होती. त्यानंतर आता पुन्हा दुसरी नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना 11 एप्रिलला चौकशीला बोलावण आलं आहे. मुंबईतील रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यातत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मी चौकशीला जाणार, कर नाही त्याला डर कशाला ? मी पोलिसांना सहकार्य करणार,या प्रकरणात कोणताही घोटाळा झाला नाही, असे ठामपणे प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी याआधी सांगितले होते.

प्रकरण काय ?

मजूर नसतानाही याच प्रवर्गातून मुंबै बँकेच्या (Mumbai Bank Case) संचालकपदाची निवडणूक लढवून सुमारे २० वर्ष सरकारची फसवणूक केल्याचा आरोप दरेकर यांच्यावरर आहे. आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांनी प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. त्यानंतर प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्याविरोधात फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे.

Latest Marathi News Updates live: सरकार स्थापनेबाबत दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत आज चर्चा होणार

संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू; विविध विधेयकांवर होणार निर्णय

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर; मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार?

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड