मुंबै बँक कथित घोटाळ्याप्रकरणी बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. मुंबई सत्र न्यायालयाने आज प्रवीण दरेकर ह्यांचा पुनर्विचार अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे प्रवीण दरेकरांना मोठा धक्का बसला असून अडचणीत वाढ होत चालली आहे.
लोकशाही न्यूजने या संदर्भात प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र, प्रवीण दरेकर यांनी या प्रकरणावर बोलण्यास टाळाटाळ केली. तसेच पत्रकार परीषद घेऊन आपली भूमिका मांडणार असल्याची माहिती दिली.
राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे अध्यक्ष असलेल्या मुंबै बँकेच्या चौकशीचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत. राज्य सहकार विभागाने मुंबै बँक कथित गैरव्यवहार प्रकरणी सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ३ महिन्यांत यासंदर्भातला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असून जिल्हा उपनिबंधक प्रताप पाटील यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.