पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला मोठे यश आले आहे. 25 ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची आज सकाळी 10 वाजता बैठक झाली. या बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे रोहित पवार म्हणाले की, #MPSC ची परीक्षा पुढं ढकलण्याचा आयोगाचा निर्णय हा संवैधानिक मार्गाने रस्त्यावर उतरलेल्या तमाम विद्यार्थ्यांचा विजय आहे. परंतु हा निर्णय अर्धवट असून पुढं ढकलण्यात आलेल्या या परिक्षेमध्ये कृषीच्या राजपत्रित २५८ जागांचाही समावेश झाला पाहिजे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, संयुक्त गट-ब व गट-क ची जाहीरात काढण्याबाबतही ठोस निर्णय झाला पाहिजे. जागा रिक्त असून आजच #combine ची जाहिरात काढायला काय हरकत आहे? सरकारने संवेदनशीलपणे विचार करावा. विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रत्येक लढ्यात कायम त्यांच्यासोबत राहू. असे रोहित पवार म्हणाले.