कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा, महाविद्यालये आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता MPSC कडून पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. एमपीएससीने परिपत्रक काढून यासंदर्भातली माहिती जाहीर केली आहे. दरम्यान, राज्यात निर्माण झालेल्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. असे या पत्रामध्ये म्हटलं आहे. २०० पदांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. आता पर्यंत ५ वेळा ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी आक्रमक झाले असून संतप्त विद्यार्थांनी पुण्यामध्ये रस्ता अडवला आहे. अहिल्याबाई शिक्षण मंडळासमोरील रस्त्यावर उतरून विद्यार्थांनी आपला संताप व्यक्त केला आहे .
१४ मार्च रोजी एमपीएससीची मार्च २०२० मध्ये होणारी पूर्वपरीक्षा होणार होती. त्यासाठी सर्व तयारी देखील पूर्ण झाली होती. उमेदवारांना प्रवेशपत्र देखील देण्यात आले होते. आता परीक्षेच्या अवघ्या २ दिवसांआधी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आता उमेदवारांकडून याविषयी मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये होणाऱ्या एमपीएससीच्या पूर्व परीक्षा कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. कोरोनाचे प्रमाण कमी झाल्या नंतर ऑक्टोबर महिन्यात परीक्षा घेण्याचे ठरले होते. ११ ऑक्टोबर तारीख ठरली होती. पण मराठा आरक्षणाच्या मुद्दामुळे परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर १ नोव्हेंबरला होणाऱ्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि २२ नोव्हेंबरला होणाऱ्या दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता पुन्हा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांमध्ये प्रचंड असंतोषाचं वातावरण आहे.