एमपीएससीची संयुक्त पूर्वपरीक्षा 4 सप्टेंबरला होणार आहे. या परीक्षेसाठी मुंबईत येणाऱ्या परीक्षार्थींना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली जात होती. या मागणीला आता यश आले आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हॉल तिकीट पाहून रेल्वे तिकीट देता येईल, अशी भूमिका घेतली. तर राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनीही तत्काळ सकारात्मक्ता दाखवली. त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षार्थींना शनिवारी लोकल प्रवासाची परवानगी मिळणार आहे.
मुंबईत येणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात यावी अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली होती. शेलार यांच्या यांच्या पाठपुराव्याला यश आले असून रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हॉल तिकीट पाहून रेल्वे तिकीट देता येईल, अशी सकारात्मक भूमिका रेल्वे घेतली. मात्र राज्य शासनाचा तसा प्रस्ताव आवश्यक आहे,असेही सांगितले. म्हणून तातडीने राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्या ही बाब लक्षात आणून दिली. त्यांनीही तत्काळ सकारात्मक्ता दाखवली असल्याचे शेलार यांनी सांगितले.