प्रशांत जगताप | सातारा | महाबळेश्वर येथील लिंगमळा शेखरु आदिवास क्षेत्र घोषीत करण्यात आलेल्या फलकाचे तसेच वन विभागाच्या छत्रपती प्रतापसिंह उद्यानातील फुलपाखरु फलकाचे उद्घाटन खासदार श्रीनिवास पाटील आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.
उपवनसंरक्षक महादेव मोहिते, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार सुषमा पाटील, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील उपस्थित होते. माझी वसुंधरा अभियानांतर्गत वृक्षारोपण, वन विभागाच्या हिरडा या विश्रामगृहात प्लॉस्टिक कचऱ्यापासून तयार करण्यात आलेल्या बाकांचे लोकार्पण आणि वन विभागाच्यावतीने भेकवली गावातील नागरिकांना सुर्या बंब, सोलार वॉटर हिटर व सोलर इन्व्हरर्टरचे वाटपही खासदार श्रीनिवास पाटील व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.