महाराष्ट्र

”विधानसभेला संधी मिळाली नसती”; नणंद-भावजय आमनेसामने

Published by : Lokshahi News

ओबीसी आरक्षणावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले असताना आता दुसरीकडे याच मुद्द्यावरुन नणंद-भावजय आमनेसामने आल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपवल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी केलेली. या रोहिणी खडसे यांच्या टीकेला आता स्नुषा खासदार रक्षा खडसे यांनी प्रतीउत्तर दिले आहे.

ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता? असा सवाल रोहिणी खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारत टीका केली होती. यावर आता एकनाथ खडसे यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे यांनी उत्तर दिलंय. ओबीसी समाजाने विचार केला नसता तर विधानसभा निवडणुकीत रोहिणी खडसेंना संधी मिळाली नसती, असा टोला रक्षा खडसे यांनी रोहिणी खडसेंना लगावला.खडसे यांच्या कन्या आणि खडसे यांच्या सुनबाई यांच्यातच आरोप-प्रत्यारोप सुरु झालाय.

भाजपने ओबीसी समाजाचा विचार केला नसता तर आमच्यासारख्या ओबीसींना संधी मिळाली नसती. रक्षा खडसे यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळालं नसतं, असं उत्तर रक्षा खडसे यांनी दिल आहे.

रोहिणी खडसे यांचे ट्वीट

रोहिणी खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रथमच थेट हल्ला केला. भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता…? आता गळा काढण्यात अर्थ नाही, असं त्यांनी म्हटलंय.

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीकडून गुन्ह्याची कबुली

राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आज कोकणात

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाकडून आज बीडसह, धाराशिव बंदची हाक

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस; प्रकृती खालावली