महाराष्ट्र

दोन डोस नंतरही अमोल कोल्हे कोरोना पॉझिटिव्ह

Published by : Lokshahi News

राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. धक्कादायक म्हणजे, डॉ.अमोल कोल्हे यांनी कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतले आहे. खासदार डॉ. कोल्हे यांनी स्वत: ट्वीट करून त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे.

कोरोनाचे संकट अजूनही टळलेलं नाही. गेल्या दोन दिवसांपासून मला कोरोना सदृश लक्षणे दिसत आहेत. कोरोना प्रतिबंधक लसींचे दोनही डोस पूर्ण झाले आहेत. तरी टेस्ट केल्यानंतर माझा RT-PCR रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला आहे. परंतु प्रकृती स्थिर आहे.

डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत.मतदारसंघातील पूर्वनियोजित दौरा सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहेत.माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना आवाहन आहे की त्यांनी लक्षणे आढळून आल्यास टेस्ट करून घ्यावी.शक्यतो गर्दीची ठिकाणे टाळावीत. निर्धारीत नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन कोल्हे यांनी यावेळी केले.

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड