महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कोल्हापूर शाखेच्या वतीने आज निर्भया मॉर्निंग वॉक काढण्यात आला. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनासाठी आठ वर्षे पूर्ण होत आहेत. तर कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनास साडेपाच वर्षे पूर्ण झाली आहेत.
तरीही पोलीस मास्टरमाइंड पर्यंत पोहोचले नाहीत. त्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात आज सकाळी उभा मारुती चौक ते बिंदू चौक असा भव्य निर्भय मॉर्निंग वॉक काढण्यात आला. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.