उमाकांत अहिरराव, धुळे | केंद्र सरकारनं शेतकऱ्यांवर तीन काळे कायदे लादण्याचा प्रयत्न केला, मात्र शेतकऱ्यांच्या एकजुटी पुढे केंद्र सरकारला नमते घ्यावे लागले आणि तिन्ही कायदे मागे घेण्याची वेळ आली, यापुढे केंद्र सरकारने हुकुमशाही पद्धतीने निर्णय न घेता जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावेत असे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर सत्तार यांनी जोरदार टीका केली.
देशात कुठल्याही सरकारने लोकप्रतिनिधींनी संविधानाला प्रमाण मानुन कामकाज करणे अपेक्षित आहे. एकतर्फी किंवा हुकूमशाही पद्धतीने या देशात निर्णय घेता येत नाहीत. जनतेला विश्वासात घेऊन त्यांच्या हिताचे निर्णय स्वीकारले जातात, यापुढे केंद्र सरकारने लोकशाही मूल्यांचा सन्मान करून निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा सत्तार यांनी व्यक्त केली.