पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरु आहे. या मंत्रीमंडळात खासदार नारायण राणे आणि खासदार प्रीतम मुंडे आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाचा समावेश आहे. यावर आता नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून भाजपमध्ये दाखल झालेले फायरब्रँड नेते नारायण राणे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. नुकतंच नारायण राणे यांनी दिल्लीवारी केली होती. या दिल्ली दौऱ्यानंतर नारायण राणे यांचा मोदींच्या मंत्रिमंडलात समावेश होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला. या संदर्भात प्रथमच नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
"केंद्रातील मंत्रिपदाबाबत भाजपाचे नेते निर्णय घेतील, त्याबाबत बोलणं योग्य ठरणार नाही. ज्यांना केद्रांत पाठवतील ते जातील" असं नारायण राणे म्हणाले.