सूशांत डूंबरे | राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजप आक्रमक झाली असताना आता मनसेसुद्धा मंदिरे खुली करण्यासाठी आक्रमक झाली आहे. आज मावळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कार्ला एकविरा गड पायथ्याशी मंदिर उघडण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले.
'शंखनादा'नंतर घंटानाद आंदोलन सुरू करण्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. त्याप्रमाणे आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी कार्ला एकविरा गडावर जाण्याचा हट्ट आंदोलकांनी केला होता. परंतु पोलिसांनी नकार दिल्याने पायथ्याशी घंटानाद आंदोलन केले. यावेळी सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. तसेच येत्या आठ दिवसांत सर्व मंदिरे उघडण्यात आली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसे कार्यकर्त्यांकडून देण्यात आला.