महाराष्ट्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या अमरावतीच्या दौऱ्यावर; आज 'या' जिल्ह्यांचा आढावा घेणार

Published by : Siddhi Naringrekar

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत असतात.

याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व आहे.

राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या आज दुसरा दिवस आहे. या विदर्भाच्या दौऱ्यात राज ठाकरे विदर्भातील विविध विधानसभांचा आढावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे बैठक घेणार आहेत.

आज राज ठाकरे आज पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांचा आढावा घेणार असल्याची माहिती मिळत असून राज ठाकरे पत्रकार परिषद घेऊन विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता आहे.

Rohit Pawar : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल जाहीर; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Supriya Sule : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल जाहीर; सुप्रिया सुळे ट्विट करत म्हणाल्या...

धुळ्यात मुसळधार पाऊस; शेतीचे प्रचंड नुकसान

Monkeypox : मंकीपॉक्सचा धोका वाढला; भारतात मंकीपॉक्सचा तिसरा रुग्ण आढळला

राज्यातील अंगणवाडी सेविकांकडून 1 ऑक्टोबरला राज्यभरात चक्का जाम आंदोलनाचा इशारा