कोरोना माहामारीच्या लढ्यात राज्य सरकारला हातभार मिळावा यासाठी मनसेच्या एका नेत्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली आहे. त्याच्या या मदतीचे मनसैनिक आणि सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे.
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली आहे. त्यांनी या संदर्भातले पत्र ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी मला माजी आमदार म्हणून मिळणारं मानधन कोव्हीड-१९ उपाययोजनेच्या खर्चासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देत असल्याचे त्यांनी जाहीर केले. बाळा नांदगावकर यांनी केलेल्या या मदतीचा राज्य सरकारला मोलाचा हातभार लागणार आहे.